अशी माझी माय मराठी
अशी माझी माय मराठी जन्मापासून तू जिभेवर रेंगाळते, आई म्हण, आई म्हण, हळूच सुरवात होते, स्वर-व्यंजने हातात हात घालतात, शब्दांची गोडी मनामध्ये साठतात। व्याकरणाची साथ तुझी खरी, कर्ता, क्रियापद कायम भारी, यमक, रुपके, काल तुझ्या संगती, भाषेच्या सौंदर्याला नेहमी वाढवती। अशी माझी माय मराठी! अहिराणी तुझ्या लयीत गाते, कोकणी तुझ्याच तालात नाचते, शुद्ध पुणेरी बोलकी राणी, घाटावरची भाषा तुझीच जाणी। अशी माझी माय मराठी! ज्ञानेश्वरांनी ओवीत मढवली, छत्रपतींनी तलवारीत जपली, संतांनी तुझी पताका फडकवली, शब्दसंपदेत तुझी श्रीमंती भरली। अशी माझी माय मराठी! जन्मापासून संग तुझा लाभला, आईसारखा गोड प्रवाह लाभला, शब्दांत तुझ्या संस्कार माझे, अशी माय मराठी, हृदयात माझे! - © डॉ. अलोक पवार