Posts

Showing posts from March, 2025

"तो" कधी येणार

Image
  "तो" कधी येणार…? सकाळी उठतो तुझ्यासाठी, धावत सुटतो दिवसभर, दोनशे डोळे वाट पाहती, ज्ञान उजळतो मी निखर. कधी शब्दांत गुंफतो दीप, कधी आकड्यांत रेखतो गीत, कधी स्वप्नांना देतो अर्थ, कधी विचारांना करतो मीत. दिवस जातात शिकवता शिकवता, महिने फुलतात वाट पाहता, डोळे मात्र तुलाच शोधती, "तो" कधी दारात येता? प्रत्येक रिंग एक साद वाटे, प्रत्येक ईमेल आशा गाठे, मित्राचा फोन जणू पत्र असे, "तो" येणार का? मन शोधत बसे. दिवस गेले, महिने मावळले, बाईचे नऊ झाले पुरे, पण बारा झाले तरीही, तू मात्र दूरच उभे. अजूनही पोटात इच्छा आहे, अजूनही स्वप्नं साठलेली, श्रमाच्या या पाकळ्यांवरती, उमेद अजूनही दाटलेली. कधी येणार सांग ना तू, कधी हात माझ्या हातात तू, तीन आकड्यांतून सहा आकड्यांत, कधी माझ्या नशिबात तू? मी वाचतो, मी लिहितो, मी शिकवतो, मी घडवतो, पण शेवटी विचारतो एकच— "माझा तो" कधी येणार? © डॉ. अलोक पवार